
Shirur, 28 November 2026
Kalawant Jagruti महामेळावा संभाजी महाराज सभागृहात रविवार २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे.
● Kalawant Jagruti महामेळावा शिरूर मधे
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांच्या स्मृती द्विशताब्दी आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘संविधान सन्मान सप्ताह’ अंतर्गत रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी शिरूर येथे ‘कलावंत जागृती महामेळावा‘ होणार आहे.
● Kalawant Jagruti : कार्यक्रम संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती शिरूर
हा कार्यक्रम संभाजी महाराज सभागृह, पंचायत समिती शिरूर (जि. पुणे) येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडेल.
‘बी एस ४ अभियान’, ‘मूलनिवासी सभ्यता संघ’ आणि ‘अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये अनुषंगाने शाहिरी, गीत-गझल, कविता गायन, शॉर्ट एकपात्री प्रयोग, शॉर्ट पथनाट्य, ब्रास बँड वादन, हलगी-संबाळ-ढोलकी जुगलबंदी, रांगोळी, चित्रकारी, खंजिरी वादन, बहुरूपी कला, नावे ओळखणे आणि बहुरूपी भारूड आदी कलांचे सादरीकरण होणार आहे.
सर्व वयोगटांतील कलाकारांना या मेळाव्यात संधी देण्यात येणार असून, सहभागी सर्व कलाकारांना ‘सन्मान पत्र’ देऊन गौरवले जाणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून गायक सोमनाथ गायकवाड (संस्थापक/अध्यक्ष, अ.भा. कलावंत न्याय हक्क समिती) आणि लोककवी-गायक चंद्रकांत झुंझार (मिशनरी सिंगर, मूलनिवासी सभ्यता संघ) काम पाहत आहेत.
■ Read more>>>>>>>





