एकत्रित बातमी
शिरूरमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल; विनयभंग प्रकरणासह मारहाणीच्या घटनेत ५ जणांविरुद्ध कारवाई
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत ३० सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात विनयभंगाच्या आरोपावरून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ८६४/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ७४, ७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, संविदणे गावच्या हद्दीत आणेवारीचे काम समजावून सांगण्याच्या बहाण्याने आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र चव्हाण करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत मारहाण व दुखापत प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुरावनगर, शिरूर येथे झालेल्या वादातून फिर्यादी महिला व तिच्या पतीला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी लकी तात्यासाहेब दिवटे, प्रतिक्षा लकी दिवटे आणि तीन अज्ञात इसमांविरुद्ध गु.र.नं. ८६५/२०२६ अन्वये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत असून, तक्रारीतील आरोपांची पोलीसांकडून चौकशी सुरू आहे.




