शिरूरमध्ये ATM कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक.
(Updated on 17 September 2026)
ATM Fraud : एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकाची ₹38,000/- ची फसवणूक
●ATM Fraud : शिरूर पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल
शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 802/2026, भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
●ATM Fraud : लक्ष्मण पाचर्णे यांची फसवणूक?
दि. 08/09/2026 रोजी सायंकाळी सुमारे 17.15 वा. मौजे शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे येथील बी.जे. कॉर्नरजवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये फिर्यादी श्री. तिरसींग लक्ष्मण पाचर्णे, वय 66 वर्षे, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे हे पैसे काढण्यासाठी गेले होते.
●अनोळखी इसमाने फसवले!
त्यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या 30 ते 32 वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने “आपके पैसे कट हुये है, आप एटीएम की स्लिप क्यों नहीं ली, रुको मैं आपको स्लिप निकालकर देता हूं,” असे सांगून फिर्यादीकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर सदर इसमाने एटीएम कार्डची अदलाबदल करून फिर्यादीच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून ₹38,000/- रक्कम काढून घेतली व त्यांची फसवणूक केली.
याबाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे दि. 09/09/2026 रोजी 15.39 वा. इंट्री नं. 55/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
•आरोपी : अनोळखी इसम, वय अंदाजे 30 ते 32 वर्षे
ATM Fraud गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी आवश्यक तपास व तांत्रिक माहितीच्या आधारे कार्यवाही सुरू आहे.
●दाखल अंमलदार : पोहवा. पवार
●तपास अधिकारी : पोउपनि.चव्हाण
■Read more >>>>
Maharashtra News: राज्याच्या वर्तमानाचा शोध | Shodh Mohim



