शिरूर | प्रतिनिधी
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये मारामारी करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तसेच सायबर छळ व धमकी दिल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोलेगाव येथील पडवळ मळा परिसरात ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता बाजरी मळणी मशीनचा भुसा शेतात आल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली, तसेच दगडाने मारल्याने चंद्रकांत पडवळ यांच्या बरगडीला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गु.र.नं. ८६८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत शिरूर शहर परिसरातील १८ वर्षे ८ महिन्यांच्या विद्यार्थिनीला Snapchat वरील “vishalkhatpe26” या अकाउंटवरून अश्लील फोटो पाठवून, तिचे फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खासगी फोटो व व्हिडिओची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच भेटण्यास न आल्यास व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गु.र.नं. ८७१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.




